लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
2:56 PM
0
टिप्पण्या
शब्दांच्या पलीकडे एक मराठी जीवंत मनाचा ठाव घेणारा एक प्रवास...
भेटूया का?..
ओथंबलेल्या घनात ..
त्या रिमझिमत्या पावसात ..
नको उघडूस ती छत्री,
जरा भिजुदेत ना सरी
भेटूया का?..
झोंबत्या गार वाऱ्यात ..
त्या कोसळत्या धबधब्यात ..
घेवुन हात तुझा हातात,
जरा सावरुदेत ना खडकात
भेटूया का?..
उधळत्या सागर लहरीत ..
त्या बांधावर छत्रीत ..
सामावत तुझ्या मिठीत,
जरा लाजुदेत ना खळीत
भेटूया का?..
गोड गोड स्वप्नात ..
त्या फुललेल्या बनात ..
हरवेन मी हरपेन मी,
पुन्हा शिरता त्या क्षणात...
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
2:44 PM
0
टिप्पण्या
तू हसलीस की बघत बसतो मी...
तू बघितलेस की जग विसरतो मी...
तू हो म्हणालीस तर पूर्ण जगाशी लड़ें मी...
नाही म्हणालीस तर आयुष्यभर रडत बसेन मी ...
प्रेम व्यक्त करावेसे वाटते पण करू शकत नाही ...
कारण तू नाही म्हणालीस तर मी जगु शकत नाही...
जगायची चिंता कुणाला आहे ? मला तर नाहीच...
तुझ्या प्रेमात पडून कधीच मेलो आहे मी...
जगायचे असते तर प्रेम कुणी का केले असते ?
अरे प्रेमात पडून मरायची मजाच काही और असते...
तुझ्याशिवाय आणखी काही सुचत नाही ...
तहान भूक सोड आता झोप ही येत नाही...
प्रेम कसे झाले आज पर्यंत समजले नाही ग...
तुला पाहिलेला पहिला दिवस मी अजुन विसरलो नाही ग...
तुझ्या प्रेमात पडून सर्व विसरलो आहे ग ...
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
2:42 PM
0
टिप्पण्या
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना
माझ्या गालावरची खळी तुझ्या ओठाआड़ दडताना
तुझ्याच प्रेमाच्या मोहात माझे प्रेम पडताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!
माझा गेलेला तोल तू हलुवारपणे सावरताना
मनातला गोंधळ हलक्या स्पर्शाने आवरताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!
तुझ्या बाहुपाशांत मी सुख-स्वप्नं रंगवताना
मावळत्या सुर्यालाही आशेचे किरण पांगवताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!
दुरवर उभा राहून तू माझ्याकडे पाहून हसताना
मृगजळ असुनही सारं काही सत्यात भासताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!
पोटातलं दुःख लपवुन ओठात हसू ठेवून वागताना
तरीही माझ्या सुखासाठी देवाकडे मागणं मागताना
बघायचंय मला तुला --- माझ्यावर प्रेम करताना !!!
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
2:42 PM
0
टिप्पण्या
रडायचे नाही म्हणुन खुप अड़लो मी
विसरून जाइन तुला समजून किती रडलो मी
का तूला आठवू... हाच विचार करतो मी
अळव्यावरच्या थेम्बा प्रमाने क्षण क्षण मरतो मी
नाही कधी जाणार आपण भेटायचो जिथे
मनात माझ्या रोज ठरवतो मी
तुझी अनुपस्तिथि असल्याने जीवनात
रोज तिथे एकांतात रडतो मी
नको दिसावा तुझा चेहरा
रोज देवास पाया पडतो मी
पाकिटात्ला तुझा फोटो फाड़तान्ना
गलात्ल्या त्या खलीवर रडतो मी
एकपण वस्तु तुझी का ठेवावी जवळ
म्हणुन कपाटातल्या सरव्या वस्तु काढतो मी
प्रत्येक वस्तु एकदा ह्रुदयाला लाउन
मुक्त कंठाने रडतो मी ........
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
2:40 PM
0
टिप्पण्या
उमगले मजला उशिरा जरासे,
जो नव्हतो कधिहि..
तो भासवित होतो..
उशिराच भेटला
तो मीच होतो..
माझ्यावरिहि त्या,
मी उपहासत होतो..
निशब्द तो तरिहि,
अर्थ बोध होतो..
भले शब्द समर्थ्य,
मी भासवित होतो..
उमगले मजला उशिरा जरासे,
जो नव्हतो कधिहि..
तो भासवित होतो..
तो गुज साम्भाळी,
ओल्या भावनान्चे
जो शुष्कची होता,
तो मीच होतो..
जो भासतो तो,
मीच होतो..
जो मीच होतो,
तोच मी नव्हतो..
उमगते मनास जेव्हा,
क्षण कल्लोळ होतो..
तरी तटस्थ मी,
स्वतःस भासवित होतो..
उमगले मजला उशिरा जरासे,
जो नव्हतो कधिहि..
तो भासवित होतो..
- प्रसाद कुलकर्णी, पुणे
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
2:35 PM
0
टिप्पण्या

इच्छा होती माझी
ती सांगेल तसे हसत हसत
जगण्याची इच्छा होती माझी...
माझ्या बरोबर राहण्याची
तयारीच नव्हती तीची...
प्रत्येक गोष्ट तीची हसत हसत
एकण्याची इच्छा होती माझी...
मला काही मनातल सांगावे
गरजच नव्हती तीची...
ती मागेल ते सारे हसत हसत
देण्याची इच्छा होती माझी...
हृदयच काय श्वाश ही सोडण्याची
तयारी होती माझी...
माझ्या कडून काही घ्यावे
इच्छाच नव्हती तीची...
कधी तरी मला समजावून घ्यावे
हीच तिच्या कडून इच्छा होती माझी...
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
10:07 AM
0
टिप्पण्या
मनात नव्हतं गं
पण ते होऊन गेलं
माझं विचित्र वागणं
तुला दुखाऊन गेलं...
माझं तसलं वागणं
मला आता छळतय
माझं खरच चुकलं
मला आता कळतय...
तू मला बोलून घे
स्वतःला जाळू नकोस
काहीही शिक्षा कर
पण मला टाळू नकोस...
आता माझ्या जगण्याचं
तूच कारण आहेस
तुझं दूर जाणं म्हणजे
माझं मरण आहे...
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
11:07 AM
0
टिप्पण्या
मी आता ठरवले आहे, शांतपणे दंगा करायचा
खूप मोठ्यंदा हळूच हसायचे, आणि गप्प बसून जोरात गायचे
गाउन दमल्यावर मी झोपायला गेलो, थोडावेळ पडून राहिलो
शेवटी झोप येत नाही म्हणून, वैतागून झोपी गेलो
नंतर तिथे मला,एक नसलेला माणूस दिसला
माझ्या जवळ येऊन मला, तो लांबूनच म्हणाला
"मी तुला इथे दिसलो असा नसलेला
हे प्लीज़ तू सांगू नकोस कोणाला"
मी म्हणालो, मी हे कुणाला का सांगू नको ?
तो म्हणाला, मी नियम मोडला म्हणून कटकट नको ! (नोट:- नसलेला असल्याचा नियम)
मी म्हणालो, प्रत्येक नियमाला असतात अपवाद,
तो म्हणाला, ह्या नियमालाही आहे अपवाद !
(नोट:- विचार करा "प्रत्येक नियमाला असतात अपवाद" चा अपवाद पॅरडॉक्स आहे))
म्हणालो ठीक आहे, मी कोणाला नाही सांगणार
सांगितले तर फक्त मी सगळ्यांना सांगणार
म्हणाला सगळ्यांना सांगितले तर ठीक आहे
पण कुणाला सांगितले तर मात्र प्रॉब्लेम आहे
मी म्हणालो, तू असा कसा आहेस नसलेला
तो म्हणाला, सांगतो तुला कसा आहे मी असा नसलेला
"जो माणूस असतो तो असतो तिथे असलेला,
जो माणूस नसतो तो नसतो तिथे असलेला
म्हणूनच जेव्हा मी नसतो इथे असलेला
तेव्हा, मी असतो इथे नसलेला ! "
तो म्हणाला पुढे, "समजावले हे मी तुला
करतो हात पुढे, पैसे दे तू आता मला"
मी म्हणालो, मी कधी म्हणालो की "मी तुला पैसे देईन" ?
तो म्हणाला, खोटारडा आत्ताच म्हणालस की "मी तुला पैसे देईन !" (नोट:- वरचे वाक्य बघा, खरच म्हणाला !)
मी म्हणालो, खोटरड्यांचे मात्र एक आपले बरे असते
त्यांचे खोटे वाक्य देखील खरे असते
माझ्यावर विश्वास ठेव, खरे सांगतो खोटे नाही
हे वाक्य खोटे आहे हे खरे आहे खोटे नाही
ऐकून आमचे हे विचित्र बोलणे, फिरले माझे मस्तक
जाग आली तेव्हा माझ्या हातात होते, "MBA लॉजिक" चे पुस्तक
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
5:15 PM
2
टिप्पण्या
मी कमी बोलतो म्हणुन
शब्द कागदावर उतरतात,
बोलायला गेलो तर वेडे,
ओठातुनाच परततात...
तुला डोळे भरून पहायच असत पण,
तू आलीस की डोळेच भरून येतात,
आणि बोलायच म्हटल तर शब्द,
मुकेपन धरून येतात...
गप्पच रहावस वाटत,
तुझ्याजवल बसल्यावर,
वाटत तू सगल ओलखावास,
मी नुसत हसल्यावर...
वाटत तुला चोरून भेटताना,
कोणी मला बघाव,
आणि त्याच्यादेखत ऐटीत मी,
तुझ्यासवे निघाव...
श्रवानाताल्या सरिसारख,
तुझ येन जाण,
आणि पागोलीच्या पाण्यासारख,
तुझ उरून राहण...
तू अस काही पहिलस की वाटल,
खरच पाउस पडायला हवा,
मी अंग चोरताना तुझा,
धिटाइचा स्पर्श घडायला हवा...
तू चिंब भिजल्यावर तुझ्या गालावरचे थेंब,
गालावरच रहायला तरसतात,
क्षणभर का होइना ते,
गुरुत्वाकर्शनाच विसरतात...
चिंब भिजल्यावर तहान लागते ना,
तस होत तुला भेटल्यावर,
तुलाच पाहत रहावस वाटत,
तुझ्या कुशीत मिटल्यावर...
तू भेटलीस आणि मी,
नगर वसवायाची भाषा करायला लागलो,
नगराची वेस म्हणुन,
क्षितिजरेशाच धरायला लागलो...
रस्ता वलन घेत गेला,
पावल त्यावर पडत गेली,
आपल्या दोघातील प्रत्येक घटना,
अशी न ठरवता घडत गेली...
आता आरशात पहाताना वाटत,
मी मला दिसणार नाही,
इतका तुझा झाल्यावर,
मी माझ्यापाशी असणार नाही...
सुकलेली पान पडतात ना,
वारा सुटल्यावर,
तशी तुझी स्वप्न पडत राहतात,
मी डोळे मिटल्यावर...
तरसन्याचा अनुभव,
आभाल बरसताना मी घेतला,
तू न्हावतिस तर प्रत्येक थेंब,
माझ्या अंगोपंगी रुतला...
तुझ्या आठवानिनी मुलायम होण,
हे नेहमिचच झालय,
मला वाटत हे नव वार,
तुझ्याकडूनच आलय...
नसती उत्तर द्यावी लागतात,
वेड्यासारख वागल्यावर,
पण वेड्यासारखच वागायला होत,
तुझी आठवण आल्यावर...
काही नाती तुटत नाही,
ते आपल्या नकळत मिटून जातात,
जाशी बोटांवर रंग ठेवून,
फुलपाखर हातून सुटून जातात...
प्रेमाला नात्यात बसवन,
खुपदा प्रेमाला घातक ठरत,
पण ते तस बसवल नाही तर,
लोकांच्या दृष्टीने पातक ठरत...
आपण त्याची सोबत धरावी,
ज्याला आपण आवडतो,
नाहीतर आपण आपल्या आवडीसाथी,
उगीच आयुष दवाड्तो...
लेखन:
फक्त मराठी...
प्रसिद्धी वेळ:
11:50 AM
0
टिप्पण्या