केव्हा केव्हा वाटत
केव्हा केव्हा वाटत
केव्हा केव्हा वाटत मिश्किल नाजुक खळी व्हाव संईच्या गालात बसून खुदकन हसाव केव्हा केव्हा वाटत सुगंधी मोगर्याचं फ़ुल व्हाव मला माझ्याही नकळत संईने केसात माळाव केव्हा वाटत तिला आवडणारी सुखद श्रावणसर व्हाव प्रेमधारांनी संईला मनसोक्त चिम्ब भिजवाव केव्हा केव्हा वाटत माघाच्या पहाटेच धुक व्हाव संईच्या आरक्त गालावरून अलगद घसराव केव्हा केव्हा वाटत मऊ कापशाची उशी व्हाव रोज संईने झोपताना प्रेमाने आलिंगन द्याव केव्हा केव्हा वाटत वार्याने उड़णारी ओढ़णी व्हाव मार्गावरून भरकटतांना संईने मला सावराव केव्हा वाटत तुला सापडणार्या शिंपल्यातला मोती व्हाव नितळ समुद्र किनारी संईने वेड्यासारख मला शोधाव केव्हा केव्हा वाटत तिच्या डोळ्यातील अश्रु व्हाव तिच्या पापण्यांवर तर कधी रुमालावर सुकाव केव्हा केव्हा वाटत तिच्या तळहातावरचा फोड़ व्हाव प्रेमाने फुंकर घालून संईने जीवापाड जपाव कधी वाटत तुझ्या परसदारातल्या प्राजक्ताचा सडा व्हाव सकाळी न तूडवता परडित संईने प्रेमाने वेचाव केव्हा वाटत तुझ्या गळ्यातला लाडका ताईत व्हाव सुखा दुखात संईने आयुष्यभर उराशी बाळगाव
0 टिप्पण्या:
Post a Comment